Wednesday, March 16, 2011

पाऊस सुद्धा...... अचानक आणीबाणी करतो !!!


 
  






पावसाची तऱ्हाच
खूप आडमुठी असते.
कधी कोरडाठाक,
कधी ढगफुटी असते.

मुसळधार,कुसळधार ,
कधी सतत धरा असतात.
कधी कडाडणाऱ्या विजा,
कधी तडाडनाऱ्या गारा असतात.

नक्षत्रांच्या भविष्याला
पाऊस थारा देत नाही!
कुणी अंदाज केला की,
पाऊस काही येत नाही !!

नाही तोपर्यंत नाही
अचानक आणीबाणी करतो
पावसाच्या मनात आले तर
पाऊस पाणी-पाणी करतो.

भ्रष्टाचाराचे  पितळही
पाऊस उघडे करतो!
रस्ते,बंधारे,तळ्यात खाणाऱ्याना
एका रात्रीत नागडे करतो !!

No comments:

Post a Comment