कुम्पनाणे शेत खाल्ले
तर काय वजा अन
काय बाकी आहे.
काय कमावले
काय गमावले
वेळ लेख्या जोख्याची आहे.
बेरजेचे रकाने कोरे
दाटी वजाबाक्यांची आहे.
हाक न बोंब कशाची ?
भरतीच मुक्याची आहे.
दगडांना देवपण येईल कसे?
जेव्हा भिंतच टाक्यांची आहे.
दाबा धरून बसले सारे
ही वेळ धोक्यांची आहे.
कारण पैदासच सारी
इथे अतिरेक्यांचे आहे.
नाव असले प्रजेचे जरी
सत्ता तर बोक्यांची आहे
सगळीकडे अतिरेक माजला
सत्ता अतिरेक्यांची आहे
आली संधी मारून घेती
प्रतीक्षा मोक्याची आहे.
इमानदारीचे नाते संपले,
सारी इमानदारी इथे धोक्यांची आहे.
लोकशाही ठोकशाही झाली,
कमाल डोक्यांची आहे.
फार काही सांगण्याची
गरज नाही समोर राजा
सोबत अशोक अन कलमाडी आहेत.
ज्यांच्या त्यांच्या तोंडी,
भाषाच खोक्यांची आहे.
बघेतले तर दिसते सारे
चूक डोळेझाक्यांची आहे !
तिरंगा सांगतो अशोक्चाक्राला,
आपलेच धड नाहीत,
काय हिम्मत त्या पक्यांची आहे?.
No comments:
Post a Comment