Wednesday, March 16, 2011

राष्ट्रकुल स्पर्धा .... !!!


राष्ट्रकुल स्पर्धा अशी
काही रंगली ,भारताच्या
कलमाडी आणि सहकार्यानी
 त्यात सर्वच मेडल मारली.
पाहून सारी दुनियाच दंगली.  

राष्ट्रकुल स्पर्धेच्या अगोदरच
लांड्या लबाड्यांचा खेळ रंगला होता
पुसाल्यावरती सांगा
कोणता टीश्यु पपेर चांगला होता 

लांड्या लबाड्यांचे विक्रम
स्पर्धे अगोदारच नोंदले गेले
याच पैश्यातून आज सांगा
किती कल-माडी बांधले गेले.

1 comment: