Tuesday, March 8, 2011

घराणेशाहीच्या नावावर........ही आहे लोकशाही !!!!




घराणेशाहीच्या नावावर ही
आहे लोकशाही. म्हणूनच
घराणे शाहीच्या पायावर
लोकशाहीचे उदक आहे.
आईच्या अध्यक्षपदाला
पोरगाच अनुमोदक आहे

हे भाग्य पिढ्या न् पिढ्या लाभो
त्यांचे हात जोडून नवस आहेत !
आता कॉंग्रेसच्या नशिबात
पुन्हा सोनियाचे दिवस आहेत !!

बोलून काही उपयोग नाही
विरोधकांनाही कळून चुकले आहे.
गरज म्हणून का होईना
त्यांना "गांधी" करून टाकले आहे. 

एकानंतर दुसऱ्या गांधीचा
कॉंग्रेसच्या हातात बोर्ड आहे !
कॉंग्रेस हे युजर नेम
तर " गांधी " हा पासवर्ड आहे.!!

No comments:

Post a Comment