Wednesday, March 16, 2011

गावाचे राजकारण ..... !!!






हुतात्मे म्हणून गेले आजचा
भारत गावागावात बसतोय? 
बघायला हे तर खरे ठरतंय
पण गावांच्या राजकारणात 
घोड मध्येच कुठेतरी  पेंड खातेय.

भाव विरुद्ध भावाला ,
बापाविरुद्ध लेकाला,
ठरवूनच  लढवले जाते .
कुरघोडीचे राजकारण
गावाबाहेरून पढविले जाते

स्वार्थी लोकांच्या हाती
गावाचे गावपण जाळून जाते
लढणारे जिंकतात-हरतात
काही जन हरून जिंकतात,
पण गावकरी मात्र हतबल दिसतात
ग्राम पंचायती म्हणजे
नवे राजकीय सुभे आहेत.
लढतात एक,हारतात दुसरे
तिसर्याचेच ग्राम पंचायती वर
ताबे आहेत .

तिसर्यांच्याच सांगण्यावरून
गावा गावात दुह्या आहेत !
लोकशाहीच्या नावावर
ह्या वेगवेगळ्या ठोकशाह्या आहेत.

गावोगावी ग्रामपंचायतीचा
जाहीर लिलाव मांडला जातो !
हे अघोरी मार्ग बघून
लोकशाहीचा श्वास कोंडला जातो.

राजकारणी देतात पेटवून
गावं मग धग धगत राहतात .
पेटलेल्या ज्वालांची मजा
मनसोक्तपणे बघत राहतात .

आपण पेटलो गेलोय
हे गावांनाही कळालेले असते !
तो पर्यंत मात्र गावाचे गावपण
बुडासकट जळालेले असते ...

No comments:

Post a Comment