अशी ही एक पार्टी असते
नाव त्याचे रेव्ह असते
ऐकायला आसे एक-एक
आक्रीतच मिळू लागले !!
रेव्ह पार्ट्य म्हणजे काय ?
कोट्याधीशांच्या कार्ट्यामुळे
आपल्याला कळू लागले.
जिथे सत्ता-संपतीची मस्ती ,
तिथे हे रोजच घडत असेल ?
कधीतरीच पोरांचा हा नंगानाच
आपल्या कानावरती पडत असेल !
सगळ्याच राजकीय पार्ट्यांना
सत्ता-संपत्यांचा चेव आहे .
कारण ज्या-त्या राजकीय पार्ट्यांची
मिळून अशी ही ‘ रेव्ह ’ आहे.
संधी मिळाली की सर्वांचाच
नंगानाच असतो ! रेव्ह पार्टीचा
अगदी नेमका हाच अर्थ असतो
No comments:
Post a Comment