आमच्या राजकर्त्यांची मस्तीच न्यारी .
काकाच्या पुतण्याला रागच भारी.
यालाच म्हणतात खुर्चीची सवारी !!
दादाला ऐकायला वेळच नाही
बिचाऱ्या शेतकऱ्यांना हे
कळतच नाही,भाषण ठोकताना
ह्यांना ध्यान राहत नाही !!
जे इतिहासात झाले नाही
ते वर्तमानात होवून आले.
’काका मला वाचवा’म्हणण्याआधीच
प्रत्यक्ष काका धावून आले !!
पुतण्याच्या दादागिरीपेक्षा
माफीनामा शेलका आहे !
जे कॅमेर्यात कैद नाही,
त्याचाच जादा गलका आहे !!
No comments:
Post a Comment