Saturday, March 19, 2011

आंधळ्या भक्ततांची .......... आंधळी भक्ती !!!


पापाचे वाटेकरी पापं
 करून-करून थकले
आणि देवपूजेला बसले !!

या पापी राजकारण्यांना नेहमी
 मागे कुणी तरी उभा लागतो.
अध्यात्माचे सोंग आणण्यासाठी
मागे कुणी तरी बाबा लागतो !!

जेवढा भक्त मोठा असतो,
तेवढाच गुरु मोठा असतो.
भोवती पाळीव प्राणी जमा होताच
मठाचा सुद्धा गोठा होत असतो !!

आंधळ्या भक्ताची आंधळी भक्ती
मेन्दूचीही जागा मोकळी होते.
हवेतून घड्याळ, आंगठीच काय ?
डायरेक्ट सोन्याची साखळी सुद्धा येते !!

समजनार्याना समजलेच असेल
प्रत्येक्ष नाव घ्यायचे
कारण नाही ,त्यांच्यासाठी शाब्दिक
इशारेही काफी आहेत !!

सत्य असलेल्या बाबांच्या  
हातचालाखीला संशयाचे कारण
नाही,पुरावा द्यायला यु टयुब
 सुद्धा काही मागे नाही !!

No comments:

Post a Comment