Saturday, March 12, 2011

२६/११ ची आग ................ !!!



  
पाकिस्तानी बाटग्यानची ती
शेवटची आग होती ,करून करून
थाकलेल्यांची ती शेवटचीच हार होती.

२६/११ स पेटली होती
ती आग आग राहिली नाही.
तेव्हा जी आली होती,
ती जाग आलेजाग राहिली नाही.

हा महिमा कालचा की,
आम्हीच विसराळू आहोत ?
आम्हास न देणे-घेणे कशाचे
आम्ही फक्त दिवसपाळू आहोत ?

त्या लवलवत्या ज्वालांच्या
पुन्हा ज्योती झाल्या आहेत.
नका करू कुणी खुलासे
सर्व गोष्टी ध्यानी आल्या आहेत.

झटका भोवतालची आग,
आतले निखारे धगधगु द्या !
दुष्मनाची हिम्मत होईलच कशी
त्यांना हे निखारे बघू द्या !!

1 comment:

  1. Anonymous15.3.11

    संतोश अत्यंत सर्मपक रचना.... मस्त... हे काहीच नाही या जगात मड्यावरच्या टाळुवरचे लोनी खानारे कमी नाहीयेत...

    ReplyDelete