Tuesday, March 22, 2011

तुकोबा, होवू नये तो भक्तीचा कळस झालाय............. !!





तुकोबा, होवू नये तो
भक्तीचा कळस झालाय.
ज्यांचा घडायला पाहिजे नवस,
त्यांचा  किळस आलाय.
कुणी आपल्या बडेजावत
भक्तांना चूर करतोय.
कुणी भोळ्या भक्तांचे
दुख इथे दूर करतोय.

कुणी लावतोय अंगारा,
कुणी भक्तांचे कान फुंकतोय .
कुणी अफू-गांजाच्या नशेत
मठा-मठात झिंगतोय.

काही म्हणा पण
तुकोबा,या भोंदू बाबंच्या  
पाठी एक काठी हाणा !!

कुणी झाले मांत्रिक,
कुणी झाले तांत्रिक,
कुणी पट्टीचा एक्टर आहे.
रोग्यांची संख्या वाढताच
कुणी चक्क डॉक्टर आहे

यांच्या या बालबुद्धीला
तुम्ही फक्त नाठी म्हणा.
तुकोबा,या भोंदू बाबंच्या  
पाठी एक काठी हाणा !!

अजूनही त्यांचा
पुन्हा तोच दावा आहे.
जसे काय ज्ञानं म्हणजे
यांच्या बापाचाच ठेवा आहे.

पंढरीच्या वाळवंटी
आम्ही नाचतो आहोत.
नवे-नवे अर्थ शोधात
गाथा पुन्हा वाचतो आहोत.

एक कौतुकाची थाप
आमच्याही पाठी हाणा.
तुकोबा,या भोंदू बाबंच्या  
पाठी एक काठी हाणा !!

No comments:

Post a Comment