Tuesday, March 22, 2011

इथे कुठेही लांग्याना जागा नसते --------------- !!




दोन वाघांच्या भांडणात
मुद्दा एकच मराठी असायला पाहिजे
घरच्या राजकीय भांडणात सुद्धा
मराठी बाणा जपायला पाहिजे.

दोन्ही ठरतील वा लोक घडवतील ! 
दोघांचीही शैली ठाकरी पाहिजे.
 मात्र एकमेकांना झापायचे सोडून
लबाड लांग्याना चोपायला पाहिजे.

शैली दोघांची ठाकरी असेल
वजनात मात्र खास कोणीतरी एक असेल
दोघाच्या वादात तिसरा यायला नको
हेव्या दाव्यात मूळ मुद्दा विसरायला नको.

मराठी माणसाच्या नावाखाली
वेगवेगळे हेतू आहेत
त्यांचे प्रबोधन कुणी करावे ?
ते तर प्रबोधनकारांचे नातू आहेत.

सेनापतींच्या बाळकडूमुळेच
हा मार्मिक सामना रंगतो आहे !
चित्र-विचित्र व्यंग पाहून
दोन्हीकडचा सैनिक खंगतो आहे.

महाराष्ट्राचा तो वाघ जुना आहे !
तरी जनतेसाठी तो खास आहे !
वाघ हा वाघच असतो बाहेच्याना
इथे कुठे आहेर असतो ?

एक शेर तर दुसरा सव्वा शेर !
हा वाद ढाण्या वाघांचा आहे.
म्हणून लांडग्यांनी दूर राहिले पाहिजे  
कारण वाघांच्या भांडणात !
इथे कुठेही लांग्याना जागा नसते !!  

3 comments:

  1. Anonymous31.3.11

    labad lange ....va he lange mhanje congressche..

    ReplyDelete
  2. Anonymous31.3.11

    ekdum mast shabd rachana....
    घरच्या राजकीय भांडणात सुद्धा
    मराठी बाणा जपायला पाहिजे.

    dhananjay deshmukh
    nagpur

    ReplyDelete
  3. Anonymous31.3.11

    दोघाच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होत असतो ......

    सतीश कुलकर्णी
    मुलुंड

    ReplyDelete