मराठीचे राज-कारण्यानची ही...........धूर्त नीती आहे .!!!
ही आज मराठीची शोकांतिका आहे
आपलं म्हणून जवळ करणाऱ्या
माणसांचीच आता खरी गोची आहे.
मराठीचे राज-कारण्यानची सत्तेसाठी
केलेली ही वरवरची एकी आहे मात्र
आतून यांची एकच युती आहे
मराठीचे राज-कारण्यानची ही
धूर्त नीती आहे.लबाड लांडग्याच्या
आता तोंडातच फक्त मराठी आहे.
उद्या मराठीचा मुद्दाच राहिला नाही
तर काय ही मुख्य यांना भीती आहे.
यांची ही चाल फार बेरकी आहे
मराठी वाचवा,मराठी वाचवा,
ओरडणारांचा एक घोळका आहे.
इंग्रजाळलेल्या माणसांना
माय मराठीचा पुळका आहे.
माय मराठीला सुगंध
कष्टकर्यांचा घामाचा आहे.
माय मराठीला पाया
ज्ञाना-तुका-नामाचा आहे.
इंग्रजाळलेल्या एवढीच
हिंदाळलेल्यांची कीव आहे !
माय मराठीची चिंता नको
माय मराठी चिरंजीव आहे !!
No comments:
Post a Comment