जर मनात आमच्या पहिले
असते डोकावून तर दिसले
असते झेंडूचे फुल.
जर लावली नसती आमच्यावर
बैलाची पैज,तर झाली नसती,
सात जन्माची जेल !!
जर आमची या जन्मात
झाली ती फजिती झाली नसती .
तर आम्हीसुद्धा बायाकाप्रमाणे
वटसावित्रीची पूजा केली असती !!
या जन्माचे दिले सोडून
पुढच्या जन्मीचे बघितले जात आहे !
आमची परवानगी न् घेताच
सात जन्मासाठी मागितली जात आहे !!
No comments:
Post a Comment