राजकारण असो की समाजकारण
धमक तुमच्यात असली पाहिजे
या धमक वर सुद्धा नशीब लिहणारी
सटवाईची नजर असली पाहिजे !!
F B वर एकाचे पाय दुसऱ्या
कडून ओढले जातात.
बघता बघता विषयाचे
कंबरडेच मोडले जातात !!
सोशल नेटवर्कींग मध्ये
सुद्धा राजकारण होतात .
आत लांडग्यानचे पिठ्ठे गुट
करून बसतात आणि मातीत ज्या
जन्मले त्यावर उलटतात !!
पण लक्षात असू द्या पाठीशी
गोंडफादर असला तरी
जोडीला नशीब असावे लागते.
नाही तर प्रत्यक्ष हिऱ्यालाही
मातीत धूळ खात बसावे लागते !!
आपलीच तुती वाजवणाऱ्या
माणसाला उन्माद हा रसातळाला
नेतो ,तर सरळ माणसाचा
सोज्वळपण हा प्रसिद्धीकडे नेतो !!
खऱ्या व्यक्तीमत्वाला कुणाचा
धोका नाही ,वेळच सांगेल
कवितेचे लिखाण कुणाच्या
बापाचा ठेका नाही !!
कुणाच्या तक्रारीने आमचे
F B अकौंट बंद पडणार नाही !
पडले तरी दुसरे उघडायला
वेळ लागणार नाही !!
दुर्दैवी माणसे कधी बघत नाहीत ?
तुमच्यात किती धमक आहे ?
केवळ नाशीबामुळेच कोळश्याना
सुद्धा आज हिऱ्याची चमक आहे !!
No comments:
Post a Comment