Wednesday, March 9, 2011

इकडे धाड,तिकडे धाड...........जिकडेतिकडे धाड आहे !!!




इकडे धाड,तिकडे धाड,
जिकडेतिकडे धाड आहे.
धाडसत्रात अचानक 
नको तेवडी वाढ आहे.

धाड..धाड..धाडी काही,
उगाच टाकल्या जात नाहीत.
माफियांच्या पिलावळी
उगाच काही सोकल्या जात नाहीत.

माफियांच्या सूळ सुलाताचे
खरे हेच तर कारण आहे !
यातून पुन्हा पुन्हा सिद्ध होते,
पैसा पैशापुढे शरण आहे.

कुणाचा बसला विश्वास,
कुणाला वाटते ही चाल आहे !
धाड धाड धाडी पडूनही
धाडीत बराच संधीकाळ आहे...

No comments:

Post a Comment