महिला आरक्षणाचा मुद्दा
म्हणजे नुसतेच ३३ टक्के
राजकारण आहे तर बाकी
सगळे न समजायचे कारण आहे.
महिला आरक्षण देणार्याने दिलेय तरी
घेणाऱ्याची झोळी फाटकी नको
महिलांचे सबलीकरण
कागदी आणि नाटकी नको
महाराष्ट्राच्या विधानसभेत
महिलांचे पहा किती टक्के प्रमाण आहे ?
सावित्रीच्या महाराष्ट्राचे
सांगा हेच का इमान आहे ?
आहेत त्या भावल्या आहेत !
त्याही स्वयंभू नाहीत
बाप, लेक,नवरा
यांच्याच त्या सावल्या आहेत.
No comments:
Post a Comment