आपणच मद्य सम्राट होवू ,
उगीच विदेशी घ्यायची कशाला ?
तू बाजरीची गाल,
मी ज्वारीची गाळतो,
आता हात भट्टीची प्यायची कशाला?
पोटाच्या भूकेलाही
दारूसोबत जळता येईल !
ज्वारी-बाजरी संपली की,
पुढे माक्याचीही गाळता येईल
आता तर सगळेच सांगू लागले
हे सरकार मान्य आहे .
ज्वारी,बाजरी,मका
हे गळीताचे धान्य आहे.
आता यांचा युक्तीवाद
कोणता पठ्या टाळू शकतो ?
तेला ऐवजी धान्यातून
आपण तर दारू सुद्धा गाळू शकतो !
No comments:
Post a Comment