लोकशाहीच्या गोंगाटात
सदचाराला गोळी असते
ज्यांची पिकायची त्यांचीच
सदा पिकलेली पोळी असतेय.
बाकीच्यांची बारामही शिमगा,
बारामही होळी असते.
व्यवस्थेच्या विरूद्ध लढले की,
उगीच पोटशूळ उठवले जाते.
वेदनेच्या अक्रोशालाही
बोंबलणे म्हणले जाते !!
ही धगधगणारी आग अशी की,
अंत:करनातं चेतले पाहिजे !
होळीचा वणवा होण्या आधीच
आक्रोशाला समजून घेतलेच पहिजे !!
No comments:
Post a Comment