सगळ्याच इंधनांचा
एकदम भडका झाला आहे.
आकडे वारी किती ही
दाखवली तरी
महागाईच्या आगीची तर
तौबा आहे!
पेटायचे राहिले आहे
असे एकही इंधन नाही !
कारण आता झळीवर झळ
बसण्याला सरकारचेही
बंधन राहिली नाही!!
भाव वाढीचे चमत्कार तर
एका रात्रीत घडले जातात
रात्री भाववाढ जाहीर होताच
क्षणात भाव वाढले जातात.
भाव कमी झाल्यावर मात्र
हे चमत्कार होत नाहीत !
मालाचे नावे स्टाक
परत भाव वाढे पर्यंत
कित्येक दिवस येत नाहीत !! ............
No comments:
Post a Comment