Tuesday, March 8, 2011

आपलेच सम्राज्या.......... साक्षीला 'सकाळ' आहे !!!!!





त्यानीच  उधळली मुक्ताफळे
पुन्हा त्यांचीच  लाही लाही आहे.
कालपर्यंतच्या  दादागिरीची
अचानक दंडुकेशाही आहे.

टाळ्याला जीभ लावून
वाट्टेल ते बोलू शकता.
घालायची असेल तर
मेडीयावर बंदी घालू शकता.

आपलेच सम्राज्या
साक्षीला 'सकाळ' आहे !
दादागिरी  आणि उर्मटपणाचा 
 उगीचच सुकाळ आहे !!

हातामध्ये पॉवर असली तरी
तोंड मात्र आवरली पाहिजे !
किमान काकाच्या  प्रतिष्ठेसाठी
पुतण्याने सावरले पाहिजे.....


No comments:

Post a Comment