Tuesday, March 8, 2011

शिक्षणाच्या बाजारापेक्षा..............





शिक्षणाचे नालंदा असलेल्या
आमच्या देशात ,ही
त्याची कळा आहे
शिक्षणाचा ज्यांना
वास नाही ,त्यांचीच
इथे दुकानदारी आहे !!

ज्यांना मंत्री मंडळात
जागा नाही त्यांना तर
याची मक्तेदारीच आहे !! 

 संशायला यात कारण नाही
साक्षीला प्रत्येक शहरात
एक इंजीनेरिंग आणि
एक मेडीकल कॉलेज आहे !!

 शिक्षणाच्या बाजारापेक्षा
मासळी बाजार तरी बरा आहे.
अशीच आजच्या शिक्षणाची
सर्व स्तरावर तऱ्हा आहे !!

ज्याची ज्याची ऐपत आहे
त्याचेच लेकरू शिकले जातेय.
वाट्टेल त्या भावाने
आज शिक्षण विकले जातेय !!

सक्तीचे आहे,मोफत आहे.
पण त्यामागेही अटी आहेत !
दऱ्यापेक्षाही मोठ्या
जिकडे तिकडे फटी आहेत !! 
जणू प्रवेश शाळा-महाविद्यालयात
 नव्हे ,संस्था अध्यक्षांच्या
केबिनमधूनच सुरू आहे !!

ज्याचा खिसा खुळखुळतो,
त्याच्या पाल्याला प्रवेश
आणि ज्याचा वशिला नाही,
त्यांना बाहेरचे गेट !!

No comments:

Post a Comment