आम्ही केले तुझेच पूजन
त्याचेच या कवींतेला हे
फळ आहे.तू लावला दिवा
आम्हीपुढे वाढवला आहे
तू दाखवून दिलेस
लिहणे आणि जगणे एक असते.
प्रतिभा कूणाची मक्तेदारी नसून
प्रतिभा अनुभूतीची लेक असते.
सांगून केलास थोडस गुन्हा
सारस्वतांना आंबणे माहित नाही.
तू वारसदार सूर्यकुलाचा
ज्यांना थांबणे माहित नाही.
तू गेलास मावळून जरी
मना-मनात उजेड ठेवला
वस्ती-वस्तीत नवा दिवा
तुझ्या शब्दांनी तेवला आहे.
तेवलेले दिव्याकडून
पुन्हा नवा गुन्हा केला जाईल !
तोझा हा सूर्यकुलाचा वारसा
असाच पुढे नेला जाईल !!
No comments:
Post a Comment