मुंबई असो वा दिल्ली
सगळे कडे यांचेच सरकार आहे.
सगळ्यांना माहित आहे यांना
कुणाचा वरदहस्त आहे
भेसळीची भीती कुणाला?
भेसळखोर बेदरकार आहे.
सोनावणे ला जाळले आहे.
उद्या तुमचा सुधा नंबर आहे पण
असा समजायचा कारण नाही
कि सर्वच अधिकारी गंगाजल आहे.
कुठे कापाकापी चालु आहे,
कुठे ढापाढापी चालु आहे.
लुटुपुटुची का होईना
सर्वत्र छापाछापी चालु आहे.
हप्ते न देणारांना शिक्षा,
हप्तेखोरांना सरळ माफी आहे !
समजणारांना समजलेच असेल
त्यांच्यासाठी इशाराही काफी आहे !!
No comments:
Post a Comment