Wednesday, March 9, 2011

झाकतो आम्ही पुढून सारे .......... उघडे मात्र मागले आहे !!!





जे राहिले ते राहिले
भागणारांचे  भागले  आहे
माझ्या धरम - निरपेक्ष 
लोकशाहीला  कसे ग्रहण
लागले आहे !!

ए.राजाच्या बेंडबाजानंतर
नवा एस.बॅंड वाजत आहे.
हजारोंच्या नंतर लाखोंचा
महाघोटाळा गाजत आहे !! 

खरे काय? खोटे काय?
वास्तव ’देवास’ ज्ञात आहे !
लोकांच्या इस्त्राळूपणाचा
घोटाळ्यांच्या मागे हात आहे !!

वरवर प्रजासत्ताक' आतून
नेतेसात्तक राज्य आहे.
प्रजेपेक्षा खुर्चीच
सरसकट पूज्य आहे !!

जय जयकार हरामखोरांचे
गोरगरिबांची छी थू आहे.
गिळले त्याने  स्वराज्य ,
राहुला सामील केतू आहे !!

सुटणार ग्रहण कधी ?
हीच एक सल आहे.
दिसते शब्दात नेराशा जरी ,
हे ग्रहणफल आहे !!

झाकतो आम्ही पुढून सारे,
उघडे मात्र मागले आहे !
माझ्या धरम - निरपेक्ष 
लोकशाहीला  असे
ग्रहण लागले आहे !!

No comments:

Post a Comment