Wednesday, March 23, 2011

अध्यात्माची गुटी ....... ???



आज काल अध्यात्माच्या

नावाने खूप संत झाले

कुणी बाबा तर कुणी
अण्णाच्या नावाने वाढले.

बुवाबाजीच्या अंगणात
आज ज्याचा त्याचा टापू आहे.
रोज नवा बाबा,
नवा – नवा बापू आहे.
मी मोठा की तू मोठा ?
याचे स्तोम तर फार आहे.
भक्तांच्या टोळ्या-टोळ्यात
जणू ग्यांगवार आहे ?

जुना भक्त नवा गुरु
उगवत्याला वंदन आहे.
आध्यात्माचे चंदन आहे.

गुरु बरोबर भक्तांना ही
आज अध्यात्माची नशा आहे.
वरून वरून कीर्तन
आतून मात्र तमाशा आहे.

बुवा तिथे बाय,
बाय तिथे बुवा आहे.
एकांतात गुरुची सेवा ,
एकांतात दुवा अये.

कीर्तांची बिदागी तर
विचारू नका किती आहे ?
अध्यात्मिक चंगळवादात
बिचारी भक्ती सती आहे.

घेणार्यांना गोड वाटते
देणार्यानाही गोड वाटते
जेव्हढी कीर्तनात गोडी वाटते.

याला धंदा म्हणा,
नाही तर लुटालुटी म्हणा
ही तर अध्यात्मिक खुटी आहे ,
जो-तो त्याच्या परीने
घडवतो ती बाळकडू ची
गुटी आहे  


No comments:

Post a Comment