छोटा नाही मोठा नाही
सरकार म्हणते शाळेत
जायला काही तोटा नाही
सरकार म्हणत असते
शिक्षणाचा खरा अर्थ
विद्यार्थ्यांना कळला पाहिजे
पण किमान एक वर्गाला एक
शिक्षक तरी मिळाला पाहिजी !
सरकार देते आहे,मध्येच
कोणी तरी खाते आहे
शालेय पोषण आहाराचे
असेच काहीतरी होते आहे.
लाट लाट लाटले तरी
शिक्षणाचा धंदा तोट्यात असतो.
कुठे उघड्यावर,
कुठे गुरांच्या गोठ्यात असतो.
शिकणारे गरजवंत,
शिकविणारे वेठबिगार आहेत !
विचारायची गरज नाही
त्यंचे किती पगार आहेत ?
शिक्षणसम्राट मात्र उगीचच
कर्मविरांची भाषा बोलू लागले !
शिक्षण म्हणजे रातीबाचे दुध
वाट्टेल तेवढे पाणी घालू लागले !!
No comments:
Post a Comment