२१ व्या शतकात सुद्धा
अबला अबला म्हणीत
तुला सतत हेटाळले जाते.
लेडीज फस्ट चे उपकार दाखवीत
तुला पुढे पुढे पिटाळले जाते !
पुरुषांच्या स्त्री दक्षिण्याला
तू नेहमीच भुलत आलीस.
स्वतःसाठी कधीच नाही
पुरुषासाठी तू फुलत आलीस !
लक्षात ठेव मानापेक्षाही
आत्मसन्मान मोठा असतो !
लेडीज फस्ट मध्येही
पुरुषत्वाचा तथा असतो !!
शेन,दगड आणि शिव्याशाप
ज्यांच्यासाठी तुम्ही सोसले
त्यांना अजून वडाचेच वेद आहे.
उपकाराची अपकाराने
अशी दरसाल फेड आहे.
शिकलेल्या बेईमानी निघाल्या,
अशिक्षितांवर राग नाही !
स्त्री-पुरुष सामानत आली
पण त्यात मेंदूचा भागच नाही !!
जशी स्त्री क्षणाची पत्नी,
अनंत काळाची माता असते.
तशी पुरुषाच्या चारित्र्याची
ती वस्तुनिष्ठ गाथा असते.
कोण कसा ?कोण कसा ?
स्त्रियांना चांगलाच ज्ञात असतो !
प्रत्येक चारित्र्यवान पुरुषामागे
एकाच स्त्रीचा हात असतो !!
म्हणूनच आम्ही दिसते ते बोलतो,
उगीच नावे ठेवत नाहीत !
चतुर्थीचा चंद्र पहिल्या शिवाय
अजूनही त्या जेवत नाहीत !!
संतोष साहेब आपण एकदम बरोबर वर्णन केले आहे .......
ReplyDeleteमस्तच .........
सुरेश पाटील
म्हणूनच आम्ही दिसते ते बोलतो,
ReplyDeleteउगीच नावे ठेवत नाहीत !
wow ...chaanch
kaviteche rachana ekdum mast ahe........
ReplyDeletekeep it up.