इंग्रजांच्या गुलामीत तिरंगा
बराच काही शिकला होता
राजगुरू ,भगतसिंगाच्या
बलिदानात सुद्धा बहरला होता
मात्र या झेंड्या च्या गर्दीत
तिरंगा गुदमरू लागला.
केवळ औपचारीक्ता म्हणून
जो तो सलाम करू लागला .
तिरंग्याचा सन्मान नाही
ती देशभक्ती आंधळी आहे !
तिरंग्याचा कचरा करते
ती देशभक्ती वेंधळी आहे !!
स्वतंत्र्य मिळवायचे नाही
आयतेच आपल्या हाती आहे.
हुतात्म्याची उपकाराचे ओझे
जन्मजात आपल्या माथी आहे.
हुतात्म्याची संधी नाही
हुतात्म्याची जान ठेवू या !
स्वताचे तर असतेच असते
जरा तिरंग्याचे ही भान ठेवू या
No comments:
Post a Comment