Wednesday, March 9, 2011

आपण तर निर्लाज्जच.............





असली काय?नकली काय? 
पंचायत होऊन बसली आहे.
नकलीचा रूबाब असा की, 
वाटते तेच असली आहे.

तेला पासुन दुधापर्यंत 
सगळे भेसळेचे धंदे आहेत
 जे समोर  पोपट शिंदे 
 सारखे  पकडले जातात
 त्यांचे पाठीराखे खंदे आहेत

  यामध्ये नवे काहीच नाही 
 फक्त गाजावाजा आज आहे 
 पुराव्यासहित सिद्ध झालेय 
 सर्वच माफियाराज आहे !!  

 सामान्य माणूस तर इथे
 रोज छळला जातो
 जो विरोध करील
 तो जाळला जातो

 आपण तर निर्लाज्जच
 झाल्याची लाजच नको
 मना मनात राग पाहिजे !
त्यांच्या हातात असेल तर
आपल्याही हातात आग पाहिजे !!

" आपल्याला काय त्याचे "
हे मस्ती तुम्ही टाळू शकता !
नसता मनमाड सारखे तुम्हा
 आम्हाला सुधा जाळू शकतात !

No comments:

Post a Comment