Wednesday, March 9, 2011

देणार्यांनी कितीही दिलें .........तरी घेणार्यांना लाज नाही.





देणार्यांनी  कितीही दिलें 
तरी घेणार्यांना लाज नाही
आदर्शाचे ३० माजले तर
लावासाचे पाणी गंगाजल नाही !

भ्रष्टाचाराची टाळी कधी
एका हाताने वाजत नाही !
म्हणून मंत्रालयात झाली
बदली करायची घाई
कुणी घेताना तर
कुणी देताना लाजत नाही.

घेणारे बिनलाजे असतील तर
देणारेही कमी नाहीत !
नैतिक उंचीपुढे दोघांना
हि इज्जत नाही !!..........


1 comment:

  1. This blog really a mirror of today's politicians......congrats & keep it up..

    ReplyDelete