Tuesday, March 8, 2011

घोटाळा ऐकला नाही तर मनाला............. चैनच पडत नाही !!!!




आपल्याला तर आजकाल
करमतच नाही, दोनचार
दिवसात नवीन घोटाळा
ऐकला नाही तर मनाला
 चैनच  पडत नाही !!

घोटाळा केवढाही असो
तो रिकार्ड ब्रेक असत नाही .
घोटाळ्यांचे आकडे ऐकून 
आजकाल धक्केंही  बसत नाहीत !!

कारण घोटाळे सम्राटांच्या  देशात
आपण जन्माला आलो आहोत !
धक्कें एवढे बसलेत की,
आपण  शॉकप्रूफ झालो आहोत !!

No comments:

Post a Comment