Thursday, March 17, 2011

दिवसाचे भांडण......रात्री पर्यंत मिटलेले बरे असते !!!




संसार म्हणले की भांड्याला
भांडे वाजणारच ,दोन जीवांच्या
खेळात पॉज सुद्धा हा असणारच

दिवसाचे भांडण रात्री पर्यंत
मिटलेले बरे असते, नसता
स्वप्नात ही टांगे मारायला
काही कमी नसते.   

भांडणापुरते भांडण तेवढ्या
पुरते ठीक असते.
उठता-बसता नवरा-बायकोची
एकमेकांना किक असते.

उठसुठ एकमेकांची
अशी पायमल्ली असते !
परस्परांचा फुटबाल न् करणे
हीच सुखी संसाराची
खरी गुरूकिल्ली असते ...

No comments:

Post a Comment