भ्रष्टाचाराचा मंत्रच
“चारा आणि चरू “ असतो.
नदी असो वा नसो,
तिथे पुलोत्सव सुरु असतो !!
असेच पुलोत्सव तर
कुठे प्रायोजित असतात !
कुठे आयोजित तर
कुठे नियोजित असतात !!
म्हणूनच नवीन रोड,नदी नाले
पहिला पाऊस झेलायला तयार नसतात !
मायबाप सरकारी अधिकारी
तर कुठे टक्के वारी शिवाय
बोलायला तयार होतात !!
हे साटेलोटे लाल दिव्याच्या
मंत्र्या पासून अधिकाऱ्या पर्यंत
भिनलेले आसते. हा लाल दिवा
मात्र वरती फिरत असतो
जनु यांच्यापासून सावध राहा
हाच इशार करत असतो !!
याच लाल दिव्याच्या प्रकाशात
स्वताचा अंधार मिटवला जातो !
लाखो गरीबांचे दिवे मालवून
पतंगासारखा गुत्तेदार ही
दिव्याभोवती चटावला जातो !!
वा भाऊ मस्तच ..........
ReplyDeleteमला लई आवडल .