Wednesday, April 27, 2011

सोशल नेटवर्किंग वरील प्रेम !!!



तरुणानो सोशल नेट वरील प्रेमाचा
बाबा काही भरवसा नसतो ! 
सुरुवात गोड असली तरी
शेवट मात्र ' फेक ' निघू शकतो !!

फेसबुक वर चाट करताना
कधी खरा चेहरा दाखवला जात नसतो
वरून कितीही इशारे केले तरी
प्रत्येक्षात भेटल्या शिवाय गुण दिसत नसतो !! 

सोशल नेटवर्कींगचे
अनुभव भले-बुरे असतात
नाव ‘फेसबुक’ असले तरी
सारेच चेहरे खरे नसतात !!

कुणी ट्विटर ग्रस्त आहेत
कुणी ओर्कुट ग्रस्त आहेत
या आभासी जगामध्ये
खरे चेहरेच त्रस्त आहेत !!

वरून-वरून जवळीक तरी
आतून ठराविक दुरावा आहे !
सोशल नेटवर्किंगच्या दुनियेत
याचा क्लिक क्लिक वर पुरावा आहे !!
म्हणूनच सोशल नेटवर्किंग
त्याला काही सोसले नाही !
तिच्या प्रेमात पडल्यावर
त्याला काहीसुद्धा दिसले नाही !!

तिच्या त्याच्या प्रकरणात
एक ग्यानबाची मेख होती !
तो जिच्या ‘नेट ‘ मध्ये अडकला
ती तर एक ‘फेक ‘ होती !!

No comments:

Post a Comment