प्रादेशिक नाहीच नाही ,
सामाजिक समतोल नाही.
महाराष्ट्राच्या त्यागाला
काहीसुद्धा मोल नाही .
‘घडलाय.. बिघडलाय”
ही तर नेहमीचीच तऱ्हा आहे !
त्याग किती ? अन्याय किती ?
प्रश्न न विचारलेलाच बरा आहे
दिल्लीतले आबुराव सोकलेले आहेत
खाबुराव सोकलेले आहेत
केंद्रातील हाय पावर लुंगीछाप
बाबुराव सोकलेले आहेत.
आज यांचा तर उद्या त्यांचाच
बळी दिला जाईल,याच बाबुरावांच्या
हातावर ,दुसरा खाबुराव हात देईल
एकीकडे प्रथ्वी-राज ,
दुसरीकडे ‘आदर्श अशोकराव’ होते.
खान्देपालाटीचा खरा साक्षीदार
आदर्श सोसायटीचा टॉवर होते.
कुणाला कुटाण्यावर जावे लागले,
कुणाला फुटण्यावर जावे लागले.
दिल्लीवाल्याच्या ‘दादागीरी पुढे
अनुभवाला चक्क वाटाण्यावर जावे लागले
कीतीही ठरवले तरी मनातून
काही अमच्या जात नाही.
कारण दिल्लीनेच दाखवून
दिले आहे की महाराष्ट्रात
अमच्या स्वच्छ ‘हात’ नाहीत.
अशी ही काँग्रेजी परंपरा
दिल्ली पर्यंत जपलेली आहे !
उलटलेल्या या अन्याय चक्रापर्यंत
ही दुर्गती येवून ठेपलेली आहे !!
...........
No comments:
Post a Comment