Monday, April 18, 2011

काळाबाजार हा काळाबाजारच असतो ...... !!!!



 
काळाबाजार हा काळाबाजारच असतो
राशन गव्हा –ज्वारी पासून तेला पर्यंत
सर्वधर्म समभाव असा
सेकुलर भाव असतो !!

राशनच्या मालाचा काळाबाजार
करताना खुल्याबाजारात काळ्या
मालाचा पांढरा लिलाव ठरत असतो.
गोर गरीबांना मात्र खाद्य
टंचाईचा बोर्ड दाखवला जात असतो !!

ग्यासचा काळाबाजार तर
रॉकेलचा निळा बाजार असतो .
उघड्याला नागड्या चा
कायमचाच शेजार असतो

दोघांच्याही टंचाईला
कालचे काही बंधन नाही !
असंतोषाचा स्फोट व्हावा
एवढे अंगी इंधन नाही !!

आमचे भाव विश्व हे
दररोज जसे वाढते आहे .
एक-एक वस्तू कशी
गगनाला भिडते आहे

अमच्या सेकुलर भाव विश्वात
स्वस्ताईला स्थान नाही
दिलेल्या आश्वासनांची कों-ग्रे-जी
भामट्यांना जान नाही !!

No comments:

Post a Comment