प्रत्येक सरकारी कार्यालया
पासून मंत्रालया पर्यंत
कंपलसरी लाच मागितली जाते
नाही दिल्यास आपली फाईल
ही नक्की लांबवली जाते !!
दरवाज्यात बसलेल्या शिपाया
पासून खुर्चीवरील बाबुरावा पर्यंत
इथे सोकालेले आहेत ,नीतीमत्ता ,
मानवतेची मुल्ये सर्व काही पैश्या पुढे
यांनी विकलेले आहेत !!
लाच मागताना ना गरीबी ,
ना श्रीमंती बघितली जाते .
प्रत्यक्ष टाटा –बिर्ला नाही
इथे लाच मागितली जाते !!
अवघड काम सोपे होईल
बोला किती नोटा आहेत ?
तुमच्या आमच्या अनुभवाचे
वाटेकरी ‘ टाटा ’ आहेत !!
टाटांचा तो गौप्यस्फोट ,
गरीबांचा तो टाहो असतो.
दोघामध्ये एवढा फरक
सांगा बरे का हो असतो ?
टाटांनी गौप्यस्फोट करतानाच
धंदेवाईकपण पाळला आहे !
लाच मागणाऱ्या मंत्र्याचा उल्लेख
मोठ्या खुबीने टाळला आहे !!
षंढानाही चीड यावी
एवढे आतिरेक होत आहेत
घोटाळ्यानवर घोटाळ्यांचे
आतिरेक होत आहेत !!
लाज-लज्जा ,आणि नैतिकता
यांना केव्हाच ‘टाटा ‘ आहे
आजचा घोटाळा पहिला की वाटते ,
कालचा कितीतरी छोटा आहे !!
No comments:
Post a Comment