Saturday, April 9, 2011

पश्चिमात्या संस्कृतीच्या टेकओव्हर ..........!!!




पश्चिमात्या उतावळी तरुण पिढी
जास्तच‘पब’ घाईला येवू लागली
तथाकथित रक्षकांच्या मते ,
संस्कृती डबघाईला येवू लागली.

पबमध्ये नंगानाच तर होतोच
आवशकता नाही राडा ही व्हावा !
संस्कृती एवढी तकलादू नाही ? 
      तिला उठता –बसता तडा जावा !!         
 पण 
दारूची दुकाने आज बंद का ?
हे त्यांना कळेना झाले
रात्रीच्या ह्यांगओवर ला
उतारा त्याना मिळेना.

कॅलेंडरवर नजर जाताच ती
गोष्ट यांना कळाली होती !
मनात पुटपुटत ती म्हणली
त्या नथुरामला बरी आजच
 सवड मिळाली होती !!

संधी मिळाली की.
सर्वांचाच असा नंगानाच असतो !
पश्चिमात्या संस्कृतीच्या टेकओव्हर चा
अर्थ नेमका हाच असतो !!

No comments:

Post a Comment