Saturday, April 16, 2011

ट्वेंटी-ट्वेंटी चा आइपीएल.............. !!





ट्वेंटी-20 ची ही जादू म्हणा   
अथवा म्हणा सोंग, पण अफलातून
च्या या खेळात नाही लक्ष्मणला भाव
प्रत्यक्ष बंगालच्या महाराजाचे तर  
लीलावातच नव्हते नाव !! 

गौतमची गंभीरता वाढली आहे ,
तर गेल आणि लाराला लाथ आहे.
धावणार्‍या घोड्यांनाच इथे चारा असतो
बाकीच्यांना मालकांनचा थारा सुध्दा नसतो.  

आमच्यावर अविश्वासाचे कारणच नाही 
मनोरंजनात सुद्धा डिप्लोमसी येते . 
तरीच लंकेच्या खेळ बोर्डाने  
दिला आहे टोला ,५ मे ला  
वापस या नाही तर  
म्हणतो पोरानो आम्हाला सोडा  

खेळाडूंच्या कारकीर्दीत  त्यांच्या
जाहीर इज्जतीचाहा हा लिलाव आहे !!
क्रिकेटच्या नव्या बोन्सायचे
ट्वेंटी-20 हे नाव आहे !! 

खेळात पैसा ओतला की
त्याचा बरोब्बर सेल होतो  
खेळात राजकारण घुसले की
त्याचा आइपीएल होतो !! 

आइपीएलच्या लिलावनंतर
क्रिकेट सारख्या खेळाच्या
प्रतिमेचे होत आहे भंजन !
चिअर्स गर्ल्सच्या साथीने
मात्र होत आहे नेत्ररंजन !!  

राज्कीत भेसळ किती असावी ?
यालाही ठराविक मापक आहे !
घोटाळा आइपीएल साधा नाही
 बोफर्से चा तो तर बाप आहे !!

No comments:

Post a Comment