तिच्या व्याकुळ डोळ्यामध्ये
कशी लखकन वीज चमकली होती.
त्याच्यासाठीच तर ती
मोरासारखी ठुमकली होती .
तो रिमझिम –रिमझिमता
असा काही कोसळला होता.
अंधारलेल्या दिशा-दिशातून
हाहाकार उसळला होता.
कोसळता कोसळता अखेर
पाऊस एकदाचा गळून गेला .
बघता-बघता तिचे गाव
तिच्या सकट गिळून गेला.
काल भरलेली ओंजळ
आज अचानक रिती वाटू लागली !
आजकाल पावसाची
तिला अनामिक भीती वाटू लागली !!
No comments:
Post a Comment