Monday, March 21, 2011

नेते तिथे बुवा ................. !!!


राजकारण करत-करत 
बुवाबाजी होत असते ,नको त्या
बुवा बाबांचे साथ देत स्वार्थ साधत असते.
स्वार्था साठी राजकारणी
नको ते भास करीत आहेत.
धरू नये त्या बुवाचे
जाहीर पाय धरीत आहेत

बुवा तिथे नेते,
नेते तिथे बुवा असतो !
एकमेकांच्या भल्यासाठी
दोघांचाही दुवा असतो.


No comments:

Post a Comment