स्थिर सुखी संसार असण्याला
दोन गोष्टीची गरज असते
नवरा शहाणा तर नवरा
बायको दिवाणी असली पाहिजे.
अनियमित व्याख्या संसाराची
अगदी सरळ साधी असते
नवरा दहशतवादी असेल तर
बायको नक्षलवादी असते.
तिथे जाणीव कुणाला हि नसते
वाटत दोघानाही एकच असते !
आपण न्यायासाठी लढतो आहोत !
एकटे आपणच मरतो आहोत .
इथे संसाराची जाणीव
होणारच कशी ?
जेव्हा अहंकार दोघांचा आड असतो !
दोघे सुद्धा एकच करत असतात
मिळून आपल्या स्वप्नाचे
मुडदे पाडत असतात !!