कॉपी मुक्त परीक्षेची
जिथे जिथे पाटी लागू शकते
त्या त्या शाळा-महाविद्यालयांच्या
प्रवेशाची कूपाटी लागू शकते !!
अश्या पाट्या लागल्याशिवाय
विद्यार्थ्याची भीड चेपायाची नाही !
विद्यार्थ्यापेक्षा संस्थाचालकांनाच
कोपीमुक्ती झेपायची नाही !!
हातांतून चांलालेला विदयार्थी
शिक्षकाना रोखता येत नाही
कालंपर्यंत जो माल विकला ,
तो आतां विकंता येत नाही !!
कॉपी मुक्तीच्या आगीत असे
शिक्षकानाही पोळावे लागतं आहे
पोर देता का पोरं ? म्हणीत
पालकामागे पळावे लागतं आहे !!
No comments:
Post a Comment