आमच्या पेक्षा तुमचा मोठा
आमच्या विरूद्ध बोलू नका.
आम्ही कमी भ्रष्ट तर तुम्ही जास्त
आमची पोलखोल करू नका.
भ्रष्टांवर भ्रष्टांचीच
अशी राजकीय मात आहे !
माय बाप जनता वेडी नाहीय
सगळे तिला माहीत आहे !!
घोटाळ्यावर घोटाळे करत असताना
घोटाळ्यानवर ही तुलना चालल्या आहेत.
रूचल्याच तरी पचणार नाहीत
अशा सुद्ध गोष्टी खाल्ल्या आहेत.
तेच आता उघडे पडले आहेत
जे जे पापं झाकणारे आहेत !
लोकानाही दिसू लागले
कोण किती खोलात आहेत !!
No comments:
Post a Comment