लाईव्ह, लाईव्ह, लाईव्ह,
जीकडे तीकडे न्यूज लाईव्ह,
जीकडे तीकडे ’पिपली’ आहे.
गिधाडाणची नजर तर
शिकारींवर टपली आहे !!
"आम्हीच आधी,सर्वात प्रथम"
असे ढोल बडवले जातात ,
दाखवण्यासाठी काहीच नसेल तर
बातम्या सुद्धा घडविल्या जातात !!
न्यूज वाहीण्यांची जीवघेणी स्पर्धा
पूर्ण पत्रकारितेला लाजरे करते आहे !
आनंद तर साजरा करतेच परंतु
दुःख देखील साजरे करते आहे !!
No comments:
Post a Comment