Thursday, May 5, 2011

दिल्ली असो नाही तर गल्ली.......... नवरा पंगतीला लागतो !!!!



महिला सबलीकरणाचा हेतू
तिथे तिथे नक्की मार खातो .
जिथे जिथे बायकोच्या जीवावर
नवराच सुभेदार होतो !! 
आरक्षणाला अंगठा दाखवीत
अगदी सही सही नक्कल असते !
वर परत शेरेबाजी !!
चुलीपुरतीच अक्कल असते !! 
सबलीकरण झाले तरी
नवरा संगतीला लागतो
दिल्ली असो नाही तर गल्ली
नवरा पंगतीला लागतो !! 
त्याच्याशिवाय तिचे
अजून पान हालत नाही !
हे कसले सबलीकरण ?
आज्ञेशिवाय मान हालत नाही !!

No comments:

Post a Comment