Monday, May 2, 2011

ओबामाची माशीगीरी ................ !!!




ओबामांच्या भेटीचा
भारीच गाजावाजा होता?
त्यातून हाच संदेश मिळतो
की तोच जगाचा राजा होता.

ते म्हणाले तुम्ही आर्थिक
महासत्ता बनला आहात
आम्ही मोजीत बसलो होतो
अजून भेटीचा खर्च किती आहे ?

जगाचा राजा असला तरी
त्याला मात्र जीवाची गोची आहे !
जीवाच्या आकांताने त्याने
एक गोची केली ,चांगली धट्टी  
कट्टी माशी त्याने धराशायी पाडली  !!

मारून मारून काय तर म्हणे ?
ओबामानि एक माशी मारली
हे मात्र विचारू नका की ,
ती ब्रेकींग न्यूज कशी झाली? 

कोणी म्हणे स्वयराचार स्वातंत्र्यावर
ही केवढी मोठी गदा होती !
तर कोणी म्हणे ही तर ओसामा
बीनची नवी ट्रिक तर नव्हती ?

मरणाऱ्या पेक्षा मारणारा
इथे महत्त्वाचा ठरवला गेला !
एका माशीराणीचा मरण सोहळा
सार्‍या जगात फ़िरवला गेला !!

No comments:

Post a Comment