Thursday, May 19, 2011

अमेरीकेची खेळी ............... !!!



अमेरिकने पाकिस्तानात घुसून
ओसामाला गाडले आहे ,
त्याचे कशाला एवढे वेड पाहिजे ?
खरेतर आशियात अमेरिकेला
हाक्काचे लौंचींग प्याड पाहिजे  
नाचता नाचता नाचविण्याची
रीत त्यानी पाळली आहे !
दहशतवादाचा निषेध करताना
पाकिस्तानची दाढी कुरवाळली आहे 

त्यानी आजमावून पहिले
कुणाला जवळ करता येईल ?
एकदा की पाय रोवली
मग ढवळाढवळ करता येईल !

पाकच्या सहिष्णुतेचा पार
बुरखा त्यानी तार तार केला आहे
हा पाकड्याना धक्का तर बसलाच आहे !
परंतु लाडका असल्यामुळेच
पाक अमेरिकेवर रुसला आहे !!  
ओबामांना आपल्या भूमिकेतून
हेच सुचवायचे आहे !
आम्हाला अमच्या तालावर
जगाला नाचवायचे आहे !!

No comments:

Post a Comment