सत्य जिथे उभे राहते तिथे,
असत्येचा नक्की कल्लोळ असतो.
सत्य जर रेटले गेलेच नाही तर
सत्यावर अनैतिकतेचा हल्ला असतो !!
नैतिक हल्ले होऊनही
सत्य चीढत नाही, कुढत नाही !
एकवेळ सत्य बदनाम होते,
पण सत्य काही केल्या
सत्यता सोडत नाही !!
लोकांशी जर इमानदारीने वागले,
तर लोक तुम्हांला हंसू लागतात !
लोकांशी बेइमानीने वागाल ,
लोक सहज फसवू लागतात !!
याची ना खन्त ,ना नवल,
सगळेच कसे आक्रीतल्या प्रमाणे आहे !
चुकीची असली तरीही मित्राहो
शेवटी हीच जमान्याची लोकरीत आहे !!
No comments:
Post a Comment