कुणी चोरायची कुणाची कविता तर काय
निदान केलेली चोरी खपवली तरी आली पाहिजे.
चोरांनी कविता चोरावी अशी की,
ती इतरांना पचली पाहिजे !!
मित्रानो चोरी ती चोरीच असते
कधी ना कधी फुटलीच जाते,
उंटाचा मुका घेतल्याची गोष्ट सुद्धा
वाचक राजानाही पटली पाहिजे !!
इतर चोर्यांन प्रमाणेच,
कवितेच्या चोऱ्यापण पचत नसतात !
कारण कवींचे काळीज हालल्याशिवाय,
आणि हातात वही पेन घेतल्या शिवाय
कविता कधी सुचतच नसतात !!
म्हणूनच म्हणतो की दुसऱ्याची
कविता चोरून कवित्व येत नसते
कारण कवितेतील लेखणी जरी
चोरली तरीपण कवीची विचारांची
शाई त्यात भरता येत नसते !!
No comments:
Post a Comment